काटी, दि.१३: उमाजी गायकवाड
आपण कितीही व्यस्त असलात तरी, मला तुम्ही वेळात वेळ काढून शुभेच्छापर संदेश पाठविले. खरोखरच मी आनंदाने, सुखावलो!
खरतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते. पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो. माझा वाढदिवस....... आपल्या प्रेमळ शुभेच्छामुळे एक अविस्मरणीय दिन ठरला....आजचा दिवस माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी सौभाग्याचा दिवस आहे. माझ्या वैयक्तिक जीवनाची 53 वर्षे पूर्ण करत असताना व माझ्या दुकानदारी व्यवसायाची 24 वर्षे तर पत्रकारितेचे 13 पूर्ण करित असताना व त्या माध्यमातून आपल्या सारख्या प्रेमळ मानसांशी संपर्क आला. *Only News* What's Up ग्रुप यासह विविध What's Up गृप व माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सारखी जिव्हाळ्याची मानसे भेटली.व त्या माध्यमातून आपण मला भरभरुन प्रेम दिले.
म्हणूनच हा दिवस माझ्यासाठी खुप अनमोल दिवस आहे.
प्रिय मित्र, नातेवाईक, हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने what's up, फेसबुक, वैयक्तिक भेटून, फोन करुन आपण आठवणीने स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्यात, आपल्या शुभेच्छा पाहून मी नि:पक्षपातीपणे केलेल्या पत्रकारितेची ही पोचपावतीच .आपणा सर्वांकडून मिळते आहे. अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आपण मनापासून दिलेल्या शुभेच्छामुळे मी भारावून गेलो आहे. आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. तुमचे प्रेमाचे बंध असेच घट्ट राहु द्या. मैत्री, प्रेम, आणि विश्वास असाच कायम राहु द्या! ज्यामुळे मला माझी नवी वाट शोधताना एकटेपणा जाणवणार नाही.
माझ्या आजवरच्या वाटचालीत हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि स्नेह यांचा बहुमोल वाटा आहे.
आपल्या शुभेच्छा मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहेत. यापुढेही आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो हीच अपेक्षा आहे.
आपण सर्व सन्माननीय व्यक्तींनी, मित्रमंडळी, पत्रकार मित्र, शिक्षक मित्र, नातेवाईक, हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन काटी सारख्या ग्रामीण भागातील पत्रकाराचा सन्मान वाढवलात, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपणा सर्वाना धन्यवाद देतो. तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे!
आपला
पत्रकार
उमाजी गायकवाड
काटी , प्रतिनिधी