सलगरा, दि.६ :
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे शासनातर्फे जाहीर केलेला ६ जून "शिवस्वराज्य दिन" ग्रामपंचायत कार्यालय येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला.
उपसरपंच प्रशांत लोमटे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन करून झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले.
या वेळी सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, माजी पोलीस पाटील राजाराम लोमटे, अनिल मुळे, पपन पुजारी, दिलीप लोमटे, अप्पू बोधणे, माजी सैनिक दिलीप मुळे, श्रीकांत लोमटे, ज्ञानेश्वर बोधणे, प्रशांत मुळे, कमलाकर भरगंडे, अभिजीत लोमटे, रंजीत लोमटे, सचिन बोधणे
तसेच काही शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.