नळदुर्ग, दि. ७ :  
तुळजापूर तालुक्यातील येडोळा ग्रामपंचायत येथे  रविवारी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सरपंच पद्माकर पाटील , उपसरपंच लक्ष्मी जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.  

 येडोळा ता. तुळजापूर  येथे सकाळी 9 वाजता ह्या कार्यक्रमास सुरवात झाली व सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत मधुर स्वरामध्ये शिवस्वराज्य ध्वज (शिवशक राजदंड) फडकावून साजरा केला, 


या कार्यक्रमास  सरपंच पद्माकर पाटील,  उपसरपंच लक्ष्मी जाधव , तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र जाधव (मेजर) ,ग्रामसेविका एस.एस. गोरे , अंगणवाडी ताई शितल लोंढे , आशाताई कविता जाधव,  संगणक परिचालक अमित लोंढे, रोजगार सेवक अनिल लोंढे , ग्रा.प. कर्मचारी  रवि कांबळे, सुनिल जाधव , तसेच सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते.
 
Top