किलज, दि.६ :
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे ग्रामपंचायत कार्यालयातील प्रांगणात शिवस्वराज्य दिनानिमित्त पंचायत समिती सदस्य खंडूराज शिंदे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश मातोळे, गावच्या प्रथम नागरिक अर्चना शिंदे, यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून रोजी राज्याभिषेक झाला. त्यानिमित्ताने राज्य शासनाने शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर किलज येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी किलज गावचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश मातोळे, पंचायत समिती सदस्य खंडूराज शिंदे, गावच्या सरपंच अर्चना शिंदे, ग्रामपंचायत सदस्य उमेश पवार, नामदेव गायकवाड, मोरेश्वर सोमवंशी, पार्वती शिंदे, भरत गवळी, गावच्या पोलीस पाटील सुनीता मर्डे, प्रदीप शिंदे, दिनकर पाटील, पांडुरंग भोईटे, दगडू शिंदे, गोविंद शिंदे, आदी उपस्थित होते. तसेच शिक्षक गजेंद्र भोईटे आणि मोरे यांनी थोडक्यात शिवस्वराज्यदिनाची माहिती दिली आणि सर्व नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.