तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दि. ६ जुन रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर भगवा ध्वज फडकाऊन शिव स्वराज्य दिन साजरा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच सौ मंगल गवळी यांच्या हस्ते भगव्या ध्वजाची गुढी उभारून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शिवरत्न नगर येथील शिवरत्न कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व छत्रपतींचे पुजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. 

     यावेळी उपसरपंच हमिद पठाण सामाजिक ग्रा.पं.सदस्य आप्पासाहेब रणसुरे,सतिष माळी,सुधीर पाटील, संभाजी माळी ,सिकंदर बेगडे ,डॉ. रविकांत गुरव,ज्ञानेश्वर पाटील,सुधीर गायकवाड ,हणमंत गवळी,अप्पुराजे भोसले,मुकुंद गायकवाड,चनबसप्पा मसुते,शाहीर गायकवाड,पाडुरंग लोंढे,एकनाथ गायकवाड,ज्ञानेश्वर जगताप,रामेश्वर कांबळे, तुकाराम गायकवाड,नागेश घोटकर,विकास घोटकर, नागनाथ माळी,वसंत जगताप,नागनाथ मसुते,महादेव भोसले,कबीर हेडे,पंकज करंडे,गणपत शिंदे, शाहू पाटील,दादा पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  सोमदेव गोरे, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जाधव क्रीडाशिक्षक. पी. पी.जाधव , महादेव मसुते  व ग्रामपंचायत कर्मचारी  उपस्थित होते.

 
Top