उस्मानाबाद, दि. 06 :
उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 6 जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 106 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 372 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 55 हजार 998 इतकी झाली आहे. यातील 53 हजार 92 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 276 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 630 जणांवर उपचार सुरु आहेत.