तुळजापूर, दि. १ :
तुळजापूर शहरातील विश्वास नगर या नगरपरिषदेकडून विकसित करण्यात आलेल्या वसाहतीमध्ये गटारीच्या कामाची मागणी असून हे काम तातडीने करण्याची मागणी समाजसेवक दिनेश क्षीरसागर यांनी न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
विश्वासनगर हे मोठ्या लोकसंख्येची वसाहत आहे. येथे नागरिकांना गटारीची कामे अपूर्ण असल्यामुळे पाणी निचारा होत नसल्याने नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. नालीचे पाणी साचुन येथे डासांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आहे. तरी येथील नाल्यांची कामे अत्यंत तातडीने करण्याची मागणी समाजसेवक दिनेश क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे केली आहे.