काटी, दि.
 तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी येथील अंगणवाडी सेविका सौ. शाहूबाई तात्या घोडके या नियत वयोमानानुसार सोमवार दि. 31  रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी दि. 28 जुन 1993 मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून सेवेत  रुजू झाल्या. तेव्हापासून बाल मनावर संस्कार करत आज त्यांचे विद्यार्थी तरुण, तरुणी उद्योजक, व्यावसायिक, इंजिनिअर,कुशल शेतकरी तसेच शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत.


वाणेवाडी गावास आजतागायत एस.टी.बस ची सोय नसतानाही त्यांनी 5 की.मी.पायी चालत जाऊन जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या मीटिंग,बीट स्तरीय मिटिंगला उपस्थित राहत होत्या. त्याचबरोबर पती तात्या लक्ष्मण घोडके हे देश सेवेमध्ये असताना त्यांनी या कामात खंबीर साथ दिली. तसेच या पती, पत्नीनी दोन मुलांना शिक्षण देऊन दोघांनाही शिक्षक बनवले. एक सुसंस्कृत कुटुंब  बनवले. त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन   एकात्मिक बाल विकास सेवा योजने सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत एकात्मिक बाल विकास योजनेचे अधिकारी श्रीकांत  हावळे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका सौ.शाहुबाई घोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त येथोचित सत्कार करुन सन्मान केला. 

यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
Top