नळदुर्ग, दि. 23 :
पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या प्रविण अर्जुन कोल्हे वय 31 वर्षे  राहणार बोरगांव (तु) ता. तुळजापूर या तरुणाने   आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. 23 जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्यापूर्वी घडली. 


तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तु) येथील गावाबाहेर गुरूलिंगाप्पा मुळे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडास प्रविण कोल्हे याने बुधवारी दोरीने गळफास घेवून आत्महात्या केली. त्याची मानसिकता बिघडल्याने गळफास घेतल्याचे समजते. दरम्यान  आत्महत्या केल्याची घटना समजताच गावावर शोककळा परसली.    
प्रविण अर्जुन  कोल्हे  याचे वडील माजी सैनिक आहेत.  गतवर्षी त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. प्रविण हा आज प्रशिक्षणासाठी  नाशिक येथे जाणार होता. त्याची मानसिकता बिघडल्याने तो शौचास जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. या घटनेची नळदुर्ग पालिसात मयतचा भाऊ राहुल अर्जुन कोल्हे वय 27 वर्षे याने खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यत आली आहे.  

याप्रकरणी बोलताना परिवर्तनचे मारूती बनसोडे  यांनी  सांगितले की, प्रविण याचे गतवर्षी विवाह झाले असून त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने गावाला व युवकांना प्रेरणादायी होते. आात्महत्या झाल्याची घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top