नळदुर्ग ,दि.२३ :

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्याचे तात्काळ काम चालू करण्यात यावे अशी मागणी  जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शकंरराव गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळकोट हे १५ हजार लोकसंख्येचे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर हैदराबाद या रस्त्यावर वसलेले असून परिसरातील जवळपास २० ते २५ खेड्यांचे व्यापारी, शैक्षणिक सामाजिक, राजकीय केंद्र आहे. त्यामुळे येथे विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिक आदिसह‌ तुळजापूर, उमरगा, उस्मानाबाद, सोलापूर,आदि ठिकाणी  कार्यालयीन ,विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिक आरोग्य विषयक कामांसाठी नागरिकांचा सतत संपर्क असतो. 

सदरचा रस्ता खराब,असल्याने व अर्धवट असल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे काम तात्काळ चालू करण्यात यावे अशी मागणी प्रकाश चव्हाण यांनी केली आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे उपस्थित होते.

 
Top