जळकोट,दि.२३: मेघराज किलजे
कोरोनामुळे सलग दुसर्या वर्षीही शाळेची घंटा वाजलीच नाही, फक्त शिक्षकांची उपस्थिती शाळेमध्ये बंधनकारक करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मात्र ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवरच शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नसल्याने वरच्या वर्गातील विद्यार्थीचे जुनी पुस्तके गोळा करण्याचे काम शाळेत सुरू आहे .
गेल्या वर्षी सुद्धा शाळांना शंभर टक्के पाठ्यपुस्तक उपलब्ध झालेली नव्हती .जून महिना संपत आला तरी पाठ्यपुस्तके शाळेला मिळाली नाहीत. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असून शाळेत सध्या विद्यार्थ्यांना शिक्षक शाळेमधून शिकवणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या घरीच ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तके लवकर उपलब्ध करून द्यावीत .अशी मागणी पालकांनी व जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचे सहशिक्षक , महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष अभिमन्यू कदम यांनी केली आहे.