नळदुर्ग ,दि.२३ :


शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नळदुर्गच्या वतीने बुधवार दि.२३ जुन रोजी जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीप्रमाणे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त धारक-याच्या  उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याचा पंचामृतांने अभिषेक करून संपूर्ण   नळदुर्ग शहरातून भव्य यात्रा   ( पालखी )  काढण्यात आली.


 उत्सवाची सुरवात ही नळदुर्ग शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भवानी चौकातून झाली. पहाटे 6 वाजता भवानी चौक येथे समस्त धारकर्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचा पंचामृतांने महाभिषेक केला गेला. यावेळी अभिषेक मंत्राच्या जयघोषाने भक्तिमय झाला होता. अभिषेक संपन्न झाल्यानंतर महारांचा पुतळा हा पालखीत ठेवण्यात आला आणि लगेचच देवदर्शन यात्रेला सुरवात झाली .

नळदुर्ग शाहरातील भवानी चौकातून सुरवात झालेली ही पालखी यात्रा पुढे राम मंदिर - ब्राह्मण गल्ली- सावरकर चौक , छत्रपती संभाजी महाराज चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, ऐतिहासिक किल्ला गेट , क्रांती चौक , चावडी चौक , रोकड्या मारुती मंदिर , बसस्थानक , भवानी नगर , व्यासनगर  मार्गे पुढे चालत राहिली. पालखी सोहळ्यात झालेला शंखनाद आणि घोषणांच्या आवाजाने संपूर्ण नळदुर्ग परिसर हा शिवमय झाला होता 
        
  
उत्सवाच्या शेवटी पालखी ही अंबाबाई मंदिर येथे घेऊन जाण्यात आले. आई जगदंबेच्या साक्षीने मंदिरात महाराजांची महाआरती करण्यात आली आणि तिथेच कार्यक्रमाची सांगता झाली .


 यावेळी विनायक बेडगे, चेतन सगरे, उमेश अवचार, अभिषेक गवळी, अक्षय बताले ,लखन कोकणे,आदित्य कोकणे,ऋषिकेश कुलकर्णी ,शाम कोकणे,अभिषेक स्वामी, वैभव कुलकर्णी ,सोहम बेले, केशव घाटे ,अलोक कोकणे,अभिषेक हुलगे,संभाजी मदने,विजय मोरे, समाधान किल्लेदार,सूरज कांबळे, गोटू घोड़के,व बाल धारकारी आदीसह उपस्थित  होते.
         
 
Top