नळदुर्ग ,दि.१९ : 

खाद्य  तेल, इंधन व गॅस याची दरवाढ केल्याबद्दल  नळदुर्ग  येथे  काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध शनिवार दि. १९ जुन रोजी सकाळी साडे अकरा  वाजता करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल, एल पी जी  गॅस 
दरवाढी विरोधात शनिवार रोजी  कॉंग्रेसच्या  वतीने शहरातील व्यासनगरमधील वत्सला एच. पी.गॕस  एजन्सी समोर आंदोलन झाले.
‘खायाला नाही तेल, मोदी सरकार फेल', अशा आशयाचे फलक घेवून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होवुन केंद्र सरकारविरुध्द जोरदार  घोषणाबाजी  केली.


 जिल्हापरिषद सदस्य बाबुराव मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने  नळदुर्ग येथे आंदोलन करण्यात येत असुन  महागाईने जनता ञस्त आहे. तेल ,इंधन ,गँस दरवाढ मागे घेवुन  सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी  यावेळी बोलताना बाबुराव चव्हाण यानी केली. 

या आदोलनात काँग्रेसचे नळदुर्ग  शहराध्यक्ष नवाज काझी, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते   निवृत्त  प्रा. जावेद काझी, नगरसेवक  शहबाज काझी , विनायक अहंकारी , बसवराज धरणे , माजी नगराध्यक्ष  शब्बीरअली सय्यद सावकार, माजी नगरसेवक  सुधीर हजारे, सचिन डुकरे, इमाम शेख, मुन्ना शरीफ शेख , अझर जहागिरदार , माजी नगराध्यक्षा मंगल सुरवसे, माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक, महिला शहराध्यक्ष कल्पना गायकवाड, समिर सुरवसे, सामाजिक 
कार्यकर्त्यां  शाहेदाबी सय्यद , काँग्रेसच्या महिला  तालुका अध्यक्षा सुभद्रा मुळे, कांताबाई जगताप , सुनंदा काळे  आदीसह कार्यकर्ते  सहभागी झाले होते.

कॉंग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी रस्त्यावर..

पेट्रोल, डिझेल बरोबरच गॅस सिलिंडर व गोडेतेलाचे वाढलेले भाव विचारात घेऊन आज राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने येथील गॅस एजन्सी समोर स्वयपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर व फोडणी करीता गोडेतेल वापरू शकत नसल्याने प्रतिकात्मक स्वरूपात दगडाची चूल व पाण्यात मिठ मिर्ची टाकून आमटी बनवून केंद्र सरकारचा निषेध करीत घोषणा बाजी करीत आंदोलन केले.

 
Top