तुळजापूर, दि. २० :
तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथील अनिल काशिनाथ पारवे यांची
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुळजापूर
विधानसभा मतदारसंघाच्या तालुका
उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा तुळजापूर मतदारसंघाची तालुका निवड प्रक्रिया झाली असून तालुक्यात ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुका राष्ट्रवादी पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे व तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा युवक उपाध्यक्ष सचिन कदम, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, तुळजापूर शहराध्यक्ष अमर चोपदार, कार्याध्यक्ष शरद जगदाळे ,युवक नेते अभय माने, युवक नेते गणेश नन्नवरे या मान्यवरांच्या हस्ते सदर नियुक्तीपत्र तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे देण्यात आले.