उस्मानाबाद , दि. 19,
नळदुर्ग शहरातील अधर्वट असलेल्या ग्रामीण रूग्णालयाच्या उर्वरित काम करण्यासाठी सुमारे 11 कोटी 38 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे यानी आमदार राणाजगजितसिंह पाटील याना दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे केलेल्या महत्त्वपूर्ण विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
.
ग्रामपंचायतीकडील १३ व्या वित्त आयोगाची शिल्लक रक्कम व १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम अर्सेनिकम अल्बम-३० औषधांच्या खरेदीसाठी शासनाकडे जमा करण्यात आली होती. औषधांची खरेदी करुन सदरील रक्कमेतील रु.४ कोटी पेक्षा अधिकची रक्कम शासनाकडे शिल्लक आहे. या रकमेतुन रुग्णवाहिका खरेदी करण्याची मागणी शासन स्तरावर प्रलंबित असुन जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता २२ रुग्णवाहिका खरेदी करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी वित्त आयोगातील जमा रकमेतुन रुग्णवाहीका खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत संबधितांना सुचना देण्याची ग्वाही दिली.
उस्मानाबादला केवळ २ विशेषज्ञ डॉक्टर रुजू झाले आहेत. पदवीपूर्व व पदव्युत्तरचे अंतिम वर्षातील विद्यार्थी व बंधपत्र निकषाप्रमाणे सेवा करत असलेले डॉक्टर्स यांना विविध जिल्ह्यात कामाची जबाबदारी दिली होती. अशा ७०० डॉक्टरांपैकी केवळ एकाची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे, हे अन्यायकारक असुन जिल्हयातील डॉक्टर्स व विशेषज्ञांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. त्यावर ना.राजेश टोपे यांनी वैद्यकिय शिक्षण विभागाच्या संचालकांशी याबाबत चर्चा करण्याचे व रिक्त पदे भरण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे मान्य केले.
अतिदक्षता विभागात विशेषज्ञ डॉक्टरांची उणीव भरून कढण्यासाठी टेली आयसीयू सुरु करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्याची मागणी केली. ती तात्काळ मान्य करून ना. टोपे यांनी टेली आयसीयू सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर स्थापीत करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला देण्याची मागणी करण्यात आली. यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी ते सुरु करावेत अशा सुचना देखील त्यांनी दिले.
एकंदरीत परिस्थिती, समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत अनेक मागण्यांसाठी सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला.
नळदुर्ग येथिल ग्रामीण रूग्णालयाची इमारत अनेक महिन्यापासुन अधर्वट आवस्थेत असुन कोरोनाच्या सांभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरित कामांसाठी ११कोटी ३८ लाख रूपयेचा निधी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी केली. त्यावर येत्या जुलै महिन्यात निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन ना. राजेश टोपे यांनी दिले