उस्मानाबाद दि. ९

 पोलीस ठाणे, कळंब: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांचे गर्दी विषयक मनाई आदेश अंमलात आहेत. ते आदेश झुगारुन तुळजाबाई मुरलीधर काळे, रा वाकडी (के.), ता. कळंब यांनी दि. 07.06.2021 रोजी 21.30 वा. सु. वाकडी शिवारातील आपल्या शेतात सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करुन, नाका- तोंडाला मास्क न लावलेल्या लोकांची गर्दी जमवून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 च्या संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची घातक कृती केली.

            यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह साथिचे राग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top