उस्मानाबाद ,दि ९

पोलीस ठाणे, वाशी: वाशी पो.ठा. चे पथक दि. 08.06.2021 रोजी 03.00 वा. सु. रात्रगस्तीस असतांना सरमकुंडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील स्वराज हॉटेल जवळ 1)प्रकाश श्रीमंत शिंदे 2)सिकंदर रामा शिंदे, दोघे रा. बारलोणी पारधी पिढी, वाशी हे संशयास्पदरित्या आढळले. अशा अवेळी महामार्गालगत उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्यांस विचारले असता ते दोघे असंबध्द माहिती देत असल्याने त्यांना अटक करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 (अ), (ब), (क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top