तुळजापूर दि .१४ :
तुळजापूर येथील दिलीप मगर यांच्या मातोश्री श्रीमती सुमनबाई यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन (वय ७७ ) झाले. त्यांच्या पश्चात आठ मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ आणि विविध संस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी दुपारी त्यांच्यावर घाटशिळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शहरातील सर्व स्तरातील लोक उपस्थित होते.