उस्मानाबाद, दि.14 
जिल्हयातील ढोकी पोलिस ठाण्याच्या हाद्दीत  दि. 13 जुन रोजी पाहाटेपुर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 9 विविध गुन्हयातील सात आरोपीसह साडेसहा लाख रूपये किमतीचा  169 धान्याच कट्टे, किराणा सामान, गुन्ह्रयात वापरलेले वाहन असे मिळून  एकूण 6 लाख 60 हजार 607 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून सात आरोपींना ताब्यात घेतले.  


  दिनांक 13/06/2021 रोजी सकाळी पहाटे 03 ते 07 वाजण्याच्या दरम्यान पोस्टे ढोकी हद्दीतील राजेश नगर, परधीपिडी वरील माला विषयक गुन्हे करणारे संशयित आरोपी व मुद्देमाल यांचा शोध घेण्यासाठी  येथे स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच आरसीपी प्लाटूनमधील पोलीस आंमदार मिळून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

  दादा उद्धव चव्हाण वय-23 वर्षे,  अनील उद्धव चव्हाण वय-26 वर्षे,  युवराज राजाराम काळे वय-21 वर्षे,  महादेव सुरेश चव्हाण वय-20 वर्षे,  विकास उद्धव चव्हाण वय-19 वर्षे सर्व रा.राजेश नगर परधी पिडी, ढोकी, आबा आप्पा शिंदे वय-32 वर्षे रा. मोहा परधी पिडी,  अंकुश कल्याण शिंदे वय-30 वर्षे रा. ईटकुर  यांना व तेर येथील सुधाकर जाधव व  वैभव आप्पासाहेब आष्टेकर आडत दुकानदार यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून खालील वर्णनाचा माल जप्त करण्यात आला.

75 कट्टे हारभरा, 47 कट्टे सोयाबीन, 39 कट्टे राजमा, 08 कट्टे ज्वारी, किराणा समान, गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 6,60,607 रुपयेचा मुद्देमाल  जप्त केला .

 पूढील गुन्हे उघडकीस आणले..
  पोस्टे उस्मानाबद शहर गुरनं 109/21 कलम 461 380 भादवी,  पोस्टे उस्मानाबद ग्रामीण गुरनं.94/2021 कलम 461,380 भादवी , पोस्टे उस्मानाबद ग्रामीण गुरनं.69/2021 कलम 457,380 भादवी , पोस्टे ढोकी गुरनं.155/2021 कलम 461,380 भादवी, पोस्टे ढोकी गुरनं.13/2021 कलम 461,380 भादवी, पोस्टे कळंब गुरनं.198/2021 कलम 461,380 भादवी , पोस्टे येरमाळा गुरनं.70/2021 कलम 461,380 भादवी , पोस्टे वाशी गुरनं.163/2021 कलम 457,380 भादवी , पोस्टे वाशी गुरनं.94/2021 कलम 457,380 भादवी, 
रिपोर्ट :- पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. माने स्थानिक गुन्हा शाखा उस्मानाबाद 
टिम :- पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन सा. , उस्मानाबद, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवेसा, उस्मानाबद व पोलीस निरीक्षक गजानन घाडगे स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबद यांच्या मार्गदर्शनाखाली... पोउपनी माने, पोउपनी भुजबळ, पोहेकॉ/454 ठाकुर, 504 काझी, 651 शेळके, पोना/1166सय्यद,1569 चव्हाण, पोकॉ/1631ढगारे, 810 सर्जे, 1611 जाधवर, 1776 मरलापल्ले, 1819 आरसेवाड, 1814 आशमोड व एक आरसीपी प्लाटून
चालक: पोना/24 गव्हाणे, पोकॉ/1424 माने.
 
Top