उस्मानाबाद , दि. 14 रविवारी पहाटेपूर्वी पोलिस पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईतील आरोपी दादा चव्हाण याच्यावर आतापर्यंत दरोडा, घरफोडी व चोरी असे एकुण 19 गुन्हे दाखल आहेत, अनिल चव्हाण याच्यावर आत्तापर्यंत दरोडा, घरफोडी व चोरी असे मिळुन 16 गुन्हे दाखल आहेत तर आबा शिंदे याच्यावर दरोडा, घरफोडी व चोरी असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यातच कोरोना सारखी परिस्थिती असल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत असताना चोरटे शेतमालावर डल्ला मारत होते. याबाबत पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन उस्मानाबाद गुन्हा शाख येथील पोलिस अधिकारी व अमलदार यांना शेतमालाविषयी गुन्हे उघडकीस आणनेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या संदर्भात पोलिस उपनिरिक्षक माने व त्यांची टिम यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ढोकी पारदी पिढी, मोहा पारदी पिढी, पळसप पारदी पिढी, येथील काही इसम पिकअप च्या सहाय्याने शेतमाल चोरी करुन तेर येथील अडत दुकानदारांना विक्री करतात तसेच दि. 12 जुन रोजी रात्री नमुद सर्वजण ढोकी यथील नगर पारदी पिढी येथे येणार आहेत. त्यावरुन पोलिस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्ध पद्धतीने दिनांक 13 जुन रोजी पहाटे 3 ते 6 वाजण्याच्या दरम्यान कोबिंग ऑपरेशन राबवून अत्यंत शिथापिने खालील आरोपिंना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.
आरोपींची नावे - दादा उध्दव चव्हाण वय 23 वर्ष, अनिल उध्दव चव्हाण वय 26 वर्ष, युवराज राजाराम काळे वय 21 वर्ष, महादेव सुरेश चव्हाण वय 20 वर्ष, विकास उद्धव चव्हाण वय 19 वर्ष, सर्व राहणार राजेश नगर पारधि पिढी ढोकी ता. जि. उस्मानाबाद. आबा आप्पा शिंदे वय 32 वर्ष राहणार मोहा पारधी पिढी ता. कळंब, अंकुश कल्याण शिंदे वय 30 वर्ष राहणार ईटकुर ता. कळंब, वैभव आप्पासाहेब आष्टेकर वय 20 वर्ष, सुधाकर मानिक जाधव वय 35 वर्ष दोघे राहणार तेर, ता. जि. उस्मानाबाद.