काटी, दि.३
 तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे  बुधवार दि.2  जुन रोजी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सीएचओ स्नेह शिंदे ,एएनएम यु.बी.काळे यांच्यामार्फत प्रामुख्याने बिपी, शुगर, तसेच गरोदर मातांची एएनसी तपासणी करण्यात आली.तसेच यामध्ये गावातील 55 लोकांची तपासणी करताना त्यांचे ऑक्सिजन व टेम्प्रेचर तपासण्यात आले. 

      
 शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आशा कार्यकर्ती सौ.आशा काशीद, सौ.अंजना ताटे, सरपंच सौ. छाया डोलारे, उपसरपंच गौरीशंकर नकाते, ग्रामसेवक एस.ए.कोठे ,ग्रा.पं.सदस्य आदींनी परिश्रम घेतले.
 
Top