नळदुर्ग,दि.१९:
तुळजापूर तालुक्यातील
हगलूर गावातील पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्तर सौ कोमल पस्तापुरे यांच्या प्रयत्नामुळे व ग्रामस्थांच्या सहकार्याने आर्थिक व्यवहारात संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पहिले आल्याचे सरपंच ॲड जयपाल पाटील यानी "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना सांगितले.
पोस्टाच्या सर्व योजनाची माहिती ग्रामस्थाना देवुन त्यामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले. त्याचबरोबर बँकेचे सर्व व्यवहार याठिकाणी केले जाते. ग्रामपंचायतने कार्यालयातील एक कक्ष पोस्ट कार्यालयास दिले आहे. हगलुर गावात पोस्ट मास्तर सौ कोमल पस्तापुरे आल्याचे समजताच ग्रामस्थ आपल्या कामकाजासाठी धाव घेतात.
त्यामुळे हगलूर ता. तुळजापूर या गावाचे नाव जिल्ह्यात सकारात्मक दृष्ट्या वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. यापुढे ही वेगवेगळ्या क्षेत्रात आपले गावं अव्वल स्थानी पोहचेल याबद्दल खात्री असून त्याकरिता सर्व गावकरी तसेच गावासाठी नेमणुकीस असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी सहकार्य करतील हा ठाम विश्वास आहे. म्हणून लोकसहभागसह सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले .