कळंब,दि.१८ :
मुस्लिम आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी कळंब शहरात गुरूवारी टिपू सुलतान ब्रिगेड व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडकडून "एक युवक, एक पोस्टकार्ड" मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान शहरातील विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी आणि युवक उपस्थित होते.
मराठा आरक्षणनंतर आता मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम संघटना पुढे सरसावली आहे. "एक युवक, एक पोस्टकार्ड" या मोहिमेअंतर्गत गुरुवारी पोस्ट कार्यलयाबाहेर जमून टिपू सुलतान ब्रिगेड व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुस्लिम आरक्षणासह विविध मागण्यांचे पत्र पाठवण्यात आले.
पत्राद्वारे मुस्लिम अरक्षणासह 2014 साली पुण्यात हत्या झालेल्या आयटी इंजिनिअर मोहसीन शेख यास न्याय देण्यात यावा, मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा,अशी मागणी करण्यात आली.
प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे.
बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी,एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी.
मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे बळकटीकरण करावे , वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करावा.या सर्व मागण्या लवकरात लवकर पुर्ण करावे, आशी मागण्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले.
दरम्यान टिपू सुलतान ब्रिगेडचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अकीब पटेल, छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे कळंब तालुकाध्यक्ष इम्रान मिर्झा, सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस, पञकार सलमान मुल्ला, काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मुजम्मील पटेल,राष्ट्रवादी युवक तालुका सरचिटणीस आफताब तांबोळी, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष हुजेब बागवान, आवेज हन्नूरे, फैजान पटेल, तहफीम शेख, गौस नदाफ आदीजण, या "एक युवक, एक पोस्टकार्ड" मोहिमेत सहभागी झाले होते.