लोहारा, दि.१८ :
 येथील गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने एका निवेदनाद्वारे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे  शुक्रवार दि.१८ जून रोजी केली आहे.


 निवेदनात  नमूद करण्यात आले आहे की, सरपंच हा गाव गाडा चालविणारा गावचा प्रमुख लोकप्रतिनिधी आहे. ग्रामपंचायतची सर्व कामे पंचायत समिती मार्फत चालत असल्यामुळे सरपंच यांचा गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याशी सातत्याने विकास कामाच्या निमित्ताने संबंध येतो‌. मात्र पंचायत समिती लोहारा येथील गट विकास अधिकारी अकेले हे सरपंचांना अरेरावीची भाषा बोलतात. तसेच विकास कामासंदर्भात कोणत्याही फाईलवर सही करण्यासाठी पैशाची मागणी  करीत असल्याचा आरोप करुन ती मागणी पूर्ण न केल्यास अपमानीत करीत असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करुन त्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करावी. 

त्याचबरोबर याविषयी ग्रामसेवकांनी देखील लेखी तक्रार दिलेली आहे. याचा विचार करण्यात येऊन येत्या आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई न झाल्यास सरपंच परिषदेच्यावतीने कायदेशीर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

यावर प्रदेशाध्यक्ष दत्ता  काकडे, सरचिटणीस विधिज्ञ विकास जाधव, मराठवाडा कार्याध्यक्ष रामराजे जाधव, जिल्हा समन्वयक राज राठोड, मोहन पनुरे, योगिनी देशमुख, यांच्या सह्या आहेत. 
तर यावेळी उमरगा तालुकाध्यक्ष बलभीम पटवारी, तालुकाध्यक्ष संतोष करपटे, बबन फुलसुंदर, नामदेव लोभे, सागर पाटील, अखिल तांबोळी, काकासाहेब चव्हाण, सचिन मोरे, विठ्ठल साठे व रामभाऊ मोरे, सरपंच आनंद कुलकर्णी, येडबा शितोळे, उपसरपंच अविनाश चव्हाण, राहुल शिंदे, अशोक जाधव, प्रकाश चव्हाण व दिलीप राठोड आदी उपस्थित होते.
 
Top