जळकोट ,दि.१८ :

  कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगच थांबले आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. त्यात प्राथमिक शाळांपासून महाविद्यालयेही बंद आहेत. केवळ कागदोपत्री प्रक्रिया राबवली जात आहे.  सन२० २१-२२ या शैक्षणिक सत्राची सुरुवात दि. १५ जून २१ रोजी सर्व शाळा सुरू होऊन झाली. असे असले तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. मात्र नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 

त्यामुळे जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेतील इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थी चि. राजहंस संजय रेणुके याने जळकोट ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतला आहे. सदर  राजहंस  हा विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षासाठीचा इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. 

 याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती टोणपे , सहशिक्षिका श्रीमती कांबळे , सहशिक्षक सोमवंशी, तरमोडे, चव्हाण , विद्यार्थी , पालक संजय रेणुके यांचे स्वागत करून आभार मानले. तसेच पाचवी वर्गाची शैक्षणिक पुस्तकेही विद्यार्थ्यास दिली. 
यावेळी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर शैक्षणिक उत्साह ओसंडून वाहत होता.
 
Top