उस्मानाबाद ,दि.१८ :
उस्मानबाद दौ-यावर आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओ बी सी राजकीय बचाव समिती व बहुजन योध्दा सामाजिक संघटना तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद यांच्या वतीने निवेदन देऊन महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीं ना मिळणारे २७ टक्के राजकीय आरक्षण या पुढील काळात होणा-या  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कायम ठेवावे व तसेच इतर मागास्वर्गीय व मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागु करण्यात यावे,ओ बी सी जातनिहाय जनगणना करण्यात यावी,तसेच  ओ बी सी समाजाच्या मागण्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत  राज्यामध्ये कोठेही निवडणुक घेण्यात येऊ नये,आदी मागण्याचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.



 अजित  पवार यांनी ओ बी सी समाजाला वेळ देऊन सर्व प्रश्न ऐकून  घेऊन सरकार दरबारी मांडण्याचे आश्वाशन दिले. ओ बी सी आरक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण माने,बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, तेली समाज संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, पत्रकार तथा ओ बी सी आरक्षण समितीचे प्रसिध्दी प्रमुख संतोष हंबीरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी,चर्मकार संघटनेचे युवक राज्यप्रदेश अध्यक्ष नितिन शेरखाने,लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवानंद कथले, अदिवाशी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष डी. एन .कोळी,गवळी समाजाचे नेते सुरेश गवळी आदिंची उपस्थिती होती.
 
Top