तुळजापूर, दि. १९: डॉ.सतीश महामुनी
येथिल नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर शहरात नगर परिषद पुढाकाराने एकूण ६ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर (खुर्द) येथील पहिल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी महिला बालकल्याण, उपसभापती सौ. मंजुषा देशमाने, शिक्षण सभापती किशोर साठे, नगरसेवक पंडितराव जगदाळे , विजय कंदले, नारायण नन्नवरे, गुगल पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने,नगर परिषद अधिक्षक वैभव पाठक यांची उपस्थिती होती.
भयमुक्त आणि आनंददायी वातावरणात लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येण्याऱ्या नागरिकांचे आकर्षक रांगोळ्या काढून,पायघड्या घालून, सुमधुर संगीत , कुंकुम तिलक करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांना केंद्र शासनाचे राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्याबद्दल नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते तुळजाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तुळजापूर (खुर्द )यांच्यावतीने सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव, रुग्णसेवा समितीचे सदस्य आनंद कंदले , डॉ.कमठाणे डी. बी.,आरोग्य पर्यवेक्षक पांडागळे एन. के, स्टाफ नर्स श्रीमती मस्तुद सी.एम.,श्रीमती चव्हाण पी.वाय., श्रीमती काकडे एल.सी., श्रीमती कोकणे यु.के., श्रीमती अडसुळे ई,ए.,एक्स रे टेक्निशियन चौधरी आय.जी., डाटा एंट्री ऑपरेटर हिरेपट जयप्रकाश,कक्ष सेवक सागावे पी.बी यांचा सत्कार करण्यात आला .नगर परिषद तुळजापूरने तयार केलेल्या या स्मार्ट लसीकरण केंद्रामध्ये आलेल्या नागरिकांनी येथील व्यवस्था आणि नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिले स्मार्ट लसीकरण केंद्रास तुळजापूर शहरातील नागरिक , उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके आणि मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी भेट दिली. लसीकरण केंद्रावर संपूर्ण लोकांचे लसीकरण होण्यासाठी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर (खुर्द)शाळेचे मुख्याध्यापक मोटे टी.डी.,सहशिक्षक शेंडगे ए.बी. यांच्यासह इतर शिक्षक कार्यरत होते.