तुळजापूर, दि. १९ :

उस्मानाबाद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आणि पिक विमा मिळण्याच्या अनुषंगाने अर्धनग्न होऊन निवेदन देण्याचे फेसबुक लाईव्ह केल्यानंतर सदर माहिती आधारे उमरगाच्या यातील कार्यकर्त्यांना तुळजापूर येथील बायपास रस्त्यावर उस्मानाबादकडे जात असताना रोखले आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बसवून ठेवले होते.

शरद आणि शेतकरी संघटना उमरगा तालुका अध्यक्ष रामेश्वर सूर्यवंशी त्यांचे सहकारी वजीर शेख, राहुल चव्हाण हे आपल्या काळा रंगाच्या अल्टो गाडी मधून उमरगा येथुन उस्मानाबादकडे निघाले होते. तत्पुर्वी तालुकाध्यक्ष रामेश्वर सूर्यवंशी यांनी फेसबुक वरून शेतकऱ्यांच्या या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमरगा येथील कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्धनग्न होऊन निवेदन देणार असल्याची माहिती जाहीर केली होती. या माहितीच्या  आधारे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सदर कार्यकर्त्यांना तुळजापूर येथील उस्मानाबाद लातूर बायपास जवळ कावलदरा दरम्यान ताब्यात घेतले आणि तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. 
उस्मानाबाद येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये या उद्देशाने पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे दिसून येत आहे यासंदर्भात तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधला यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही. सदर कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सहा वाजता ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना मुक्त करण्यात आले.
 
Top