उस्मानाबाद,  दि.१८ : 

पोलीस ठाणे, कळंब: तांदुळवाडी येथील ग्रामसेवीका- श्रीमती उज्वला नागनाथ झगडे या सन- 2019 साली ग्रामसेवीका पदावर रुजु झाल्यापासुन त्यांना तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच- श्रीमती दिपाली नितीन काळे यांचे पती- नितीन शंकर काळे हे जीएसटीची बीलपावती न देता रकमेची मागणी करत होते. रक्कम न दिल्यास तुझी नोकरी घालवतो, तुझी बदली करतो असे धमकावत होते. तसेच नितीन काळे यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस बुकवर खाडाखोड केली व विकास कामाचे विषय खोडून “ग्रामसेवकाची बदली करा.” असे विषय टाकले. 



यानंतर दि. 06.06.2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून निघून गेले. अशा प्रकारे उज्वला झगडे यांच्या शासकीय कामात नितीन काळे यांनी जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन ग्रामसेवीका- श्रीमती उज्वला झगडे यांनी दि. 17 जून रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top