उस्मानाबाद,दि.१८:  

पोलीस ठाणे, बेंबळी: शिवाजी लोळगे, विठ्ठल लोळगे, दोघे रा. बोरगाव (राजे), अगतराव पोंदे, भागवत पोंदे, दोघे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद यांच्या गटाचा गावकरी- दिलीप घोडके, भारत घोडके, सुनिल घोडके, महेश घोडके यांच्या गटाचा सामाईक शेतबांध फोडल्याच्या कारणावरुन दि. 06.06.2021 रोजी 20.00 वा. सु. बोरगाव (राजे) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, अवजड वस्तूने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अगतराव पोंदे व दिलीप घोडके या दोघींनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top