औरंगाबाद ,दि.११ :
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी विधीज्ञ बी. एल. सगर किल्लारीकर यांची निवड झाल्याबद्दल उच्च न्यायालयाचे विधीज्ञ दयानंद माळी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायामुर्ती आनंद निरगुंडे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर त्याच्यासमवेत इतर ८ सदस्याची महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे. मागासवर्गीयांचा आभ्यास करुन विशेष अहवाल इतर सवलतीची शिफारस करण्यासाठी या आयोगाची स्थापन करण्यात आलेली आहे.
नुकतीच निवड झालेल्या ८ सदस्यामध्ये उच्च न्यायालयाचे विधीज्ञ बी. एल. सगर किल्लारीकर यांचा, व प्रा . गोविंद काळे यांचा समावेश आहे. सगर किल्लारीकर यांची निवड झाल्याचे समजताच विधीज्ञ दयानंद माळी यानी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.