उस्मानाबाद,दि.१३
पोलीस ठाणे, वाशी: 1)अनिल चौघुले 2)लता चौघुले 3)विद्या चौघुले 4)मिनाक्षी चौघुले, सर्व रा. वाशी यांनी मोबाईल देवाण- घेवानीच्या कारणावरुन दि. 12 जून रोजी कॉलनीतील नातेवाईक- राजु सुर्यभान चौघुले यांसह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राजु चौघुले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): साहेबराव फुलचंद चव्हाण, रा. जहागिरदारवाडी तांडा, ता. उस्मानाबाद हे दि. 12 जून रोजी 07.00 वा. सु. पत्नी, मुलीसह आपल्या घरी होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन तांड्यावरील- राजुबाई चव्हाण, प्रदिप चव्हाण, रेखा चव्हाण या तीघांनी साहेबराव चव्हाण यांच्या घरात घुसून साहेबराव यांसह त्यांची पत्नी, मुलीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या साहेबराव चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 337, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.