उस्मानाबाद ,दि.२३:
पोलीस ठाणे, ढोकी: गणेश बाळु बळते, रा. टनु, ता. इंदापुर, जि. पुणे यांचे महिंद्रा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 11 यु 8164 हे कौडगाव येथील नातेवाईकांकडे शेती कामासाठी होते. त्या ट्रॅक्टरचे चालक- सागर दिनकर गवई, रा. वरदडा (ल.), ता. महेकर, जि. बुलढाना यांनी, “कौडगाव फाटा येथे दिड तासाचे काम आहे ते करुन येतो.” असे गणेश बळते यांना सांगुन दि. 19.05.2021 रोजी 12.00 वा. सु. ट्रॅक्टर घेउन गेले. त्यांनतर सागर गवई हा नमूद ट्रॅक्टर घेउन आज पर्यंत परत आला नाही. अशा मजकुराच्या गणेश बळते यांनी दि. 12 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 407 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.