उस्मानाबाद,दि.१३:  

पोलीस ठाणे, लोहारा: प्रमोद रमेश काळे, रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा यांनी त्यांच्या शेतात बांधकामासाठी ठेवलेले लोखंडी पत्रे- 16 नग, लोखंडी गज- 6 नग व एक प्लास्टीक टाकी असे साहित्य दि. 10- 11.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रमोद काळे यांनी दि. 12 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, ढोकी: अविनाश ज्ञानदेव वाघमोडे व तानाजी भागवत लोमटे, दाघे रा. गोवर्धनवाडी, ता. उस्मानाबाद या दोघांच्या अनुक्रमे कावळेवाडी गट क्र. 94 व 92 मधील शेतातील तुषारसिंचन संच दि. 16- 17.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अविनाश वाघमोडे व तानाजी लोमटे या दोघांनी दि. 12 जून रोजी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top