मुरुम, दि. ५ :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक हरीत महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात शनिवारी रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक मधुकर मंमाळे, केंद्रप्रमुख गिरी , केंद्रीय मुख्याध्यापक विजयकुमार कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकट चौधरी, कंटेकुरचे मुख्याध्यापक कमलाकर मोटे, आचार्यतांडाचे मुख्याध्यापक बलभीम पुजारी, पाटीलतांडाचे मुख्याध्यापक शिवलाल राजपूत, चर्मकार संघटनेचे अध्यक्ष राजू धनशेट्टी, अरविंद बेंडकाळे, सेवानिवृत्त शिक्षक शेळके आदींची उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोपटे घरी लावण्यासाठी देण्यात आले. सहशिक्षक संतोष कडगंचे, विजयकुमार देशमाने, कल्लाप्पा पाटील, सत्येश्वर भिसे, प्रमिला तुपेरे, निर्मला यादव, रेखा निंबाळकर, राजू पवार, नागनाथ कामशेट्टी, निर्मला परीट आदींनी पुढाकार घेतला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दहा कोटीप्रमाणे पन्नास कोटी वृक्ष लागवड व संवर्धनाचे उद्दिष्ट देण्यात येते.
प्रशालेतील प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करावे. कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये ऑक्सिजनची कमतरता आपल्या सर्वांना जाणवली. यामुळे वृक्षलागवड करणे, संवर्धन व संरक्षण, संगोपन करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मुख्याध्यापक मधुकर मंमाळे यांनी यावेळी सांगितले.