नळदुर्ग,दि.१९ :
शहर युवासेना शहरप्रमुखपदी मयुर हुलगे यांची निवड युवासेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून करण्यात आले.
यावेळी तुळजापूर तालुका युवासेनेचे सर्व पदाधिकारी व नळदुर्ग शहर मिडिया सेल प्रमुख सुनिल गव्हाणे, ग्राहक कक्ष शहरप्रमुख नेताजी महाबोले, उपशहरप्रमुख सोमनाथ म्हेत्रे, ग्राहक कक्ष उपशहरप्रमुख भिमा कोळी,चंदर सगरे आदी उपस्थित होते. मयुर हुलगे यांच्या निवडीचे नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने अभिनंदन होत आहे.