उस्मानाबाद,दि.19

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे सोमवार दि.21 जून 2021 रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येणार आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी 6:30 वाजता शासकीय मोटारीने अहमदनगर येथून पाडळशिंगी-बीड मार्गे उस्मानाबादकडे प्रयाण करतील आणि सकाळी 10:00 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कार्यालयीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील.त्यानंतर सकाळी 11:00 वाजता येथील पोलिस मुख्यालयातील पेट्रोलिंग वाहन लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील; तर सायंकाळी 4:00 वाजता उस्मानाबाद येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.
 
 
Top