काटी, दि.६ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे 
 कोरोना विरुद्धच्या लढाईत ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण व इतर आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या वैद्यकीय आधिकारी,अरोग्य कर्मचारीसह  इतर कोरोना वॉरिअर्सचा गौरव करण्यात आला.


   पिंपळा बुद्रुक ता. तुळजापूर येथील लसीकरण मोहिमेत  सहभागी झालेल्या युवकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथील प्रा. डॉ. शिवाजी मस्के हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर पोलीस पाटील महादेव नरवडे व आरोग्य अधिकारी डॉ. सुरवसे व्ही.एन , दिगंबर कांबळे , उपसरपंच विजयकुमार जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


समर्पण आणि सेवा हा प्रत्येक भारतीयाचा स्थायीभाव आहे. याच भावनेतून कोरोना वॉरिअर्सने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या संकटमय काळात डॉक्टर्स ,आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका , आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक यांचे योगदान देशासाठी प्रेरणादायी आहे. गेल्या दीड वर्षापासून ते कोरोनाविरुद्ध दोन हात करत आहेत. नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे म्हणून सेवाभाव जपत त्यांचे कार्य सुरू आहे. रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा करणे ,रुग्णांना धीर देणे, त्यांचे मनोबल उंचावणे, लसीकरणासाठी प्रबोधन करून प्रवृत्त करणे , कोरोना चाचण्या करणे हे कार्य ते स्वतःचा जीव धोक्यात घालून करत आहेत. यातून त्यांनी जणू मानवधर्माचा परिचय दिला आहे. 

आपल्या कर्तव्य सेवेला मानवता व माणुसकीची जोड देणार्‍या ग्रामीण भागातील कोरोना योद्ध्यांना बळ व प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला.

यावेळी प्रा. डॉ. शिवाजी मस्के यांनी अभिनंदनपर विचार मांडले. ग्रामीण भागात जीवाची व कुटुंबाची परवा न करता  रुग्णांची दीड वर्षापासून सेवा करणाऱ्या संपूर्ण टीमला "आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत" असा विश्वास देणे एक जबाबदार नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना प्रेरणा देणे ,त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित होणे आवश्यक असते. असे सांगून डॉ. मस्के यांनी कार्यक्रमाचे आयोजक महादेव नरवडे ,विजय जाधव व त्यांना मदत करणाऱ्या युवकांचे ही विशेष कौतुक केले. 
पिंपळ्यातील तरुणांनी लसीकरणासाठी केलेले प्रयत्न विशेष असून इतर गावातील लोकांनी आदर्श घ्यावा व आपल्या गावातून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.


कोरोना वॉरियर्स सन्मानाचे मानकरी
डॉ. सुरवसे व्ही.एन. वैद्यकीय अधिकारी, डॉ. सौ.हरकरे  ,  माळी टी. एस, अरविंद भालेकर ,  गोप जे.एल. ,  शिंदे ए.जे. ,  सारंग देशमुख, श्रीममती पाटील ए. एम. ,  मेंगले व्ही .आर. , बेटकर गणेश,  हर्षा अंकुशे ,  दिगंबर कांबळे ,  दूधभाते, सौ. गीतांजली चव्हाण, सौ. अनिता धोतरकर, सौ. उर्मिला कदम, सौ. जयश्री कांबळे , सौ.मनिषा जाधव ,

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  विठ्ठल नरवडे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  कुबेर नरवडे , विनोद चव्हाण, कमलाकर कोपे ,महादेव नरवडे, विजयकुमार जाधव ,भीमराव जाधव ,विजय चव्हाण ,स्वप्नील चव्हाण यांनी विशेष पुढाकार घेतले.

महादेव नरवडे , पोलीस पाटील ,पिंपळा बु

मराठी ग्रामीण भागात काटगाव टीम खूप चांगले काम करत आहे कौतुकाची थाप अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते. त्यांनी केलेल्या सेवेचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे तसेच सरकारमधील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे त्यांना सहकार्य करावे.
       
 
Top