नळदुर्ग ,दि.६ :
निवृत्त मुख्याध्यापक, सुरेश ऊर्फ बाळासाहेब नकाते अंदाजे वय 58 वर्ष यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटेपुर्वी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,तीन मुली त्यापैकी दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

सुरेश नकाते हे नळदुर्ग शहर व परिसरातील बहुतांश गावे,वाडी,वस्ती ,तांडा येथे एल आय सी प्रतीनिधी  म्हणुन गेल्या अनेक वर्षापूर्वीपासुन परिचीत आहेत. अनेक विमा लाभार्थ्याना त्यांच्या वरसाना लाभ मिळुन दिले आहे. उल्लेखनीय कार्याबद्दल एल आय सी कडुन त्याचा वेळोवेळी गैरव करण्यात आला आहे. हे विशेष होय.
 त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली असुन सेवेत असताना त्याना अनेक पुरस्काराने गैरविण्यात आल्याचे सर्वश्रुत आहे. 
त्याःच्या निधनाबद्दल नळदुर्ग व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्याना सर्वञ श्रध्दाजली वाहण्यात आली.
 
Top