जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन आदेश जाहीर ; 
सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू राहणार!
 उस्मानाबाद, दि.६

करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत प्रतिबंधात्मक सुधारित आदेश  जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर  यांच्याकडून दि.५ जुन रोजी जाहीर करण्यात आले आहे. हे आदेश सोमवार दि. ७ जूनपासून पुढील आदेशापर्यंत उस्मानाबाद जिल्हयात लागू असणार आहेत. 

 या आदेशानुसार, जिल्हयात सर्व अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. 
शनिवार व रविवार पूर्णत: बंद राहतील. मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद राहतील. रेस्टॉसंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजपेर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.  दुपारी ४ नंतर तसेच, शनिवार व रविवार केवळ पार्सल सेवा, घरपोच सेवा  सुरू राहील. तसेच,  उस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणे(उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहातील.

 सुट देण्यात येत असेल्या आस्थापना, सेवा व्यतिरिक्त खासगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी  क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील. तर, जिल्ह्रयात सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-१९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. अत्यावश्यक व करोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त शासकीय कार्यालये ५० टक्के अधिकार, कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील. 
मेळावे सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 पर्यंत ५० लोकांची मर्यांदा ठेवण्यात आली आहे. जिम, सलून,  ब्यूटी पार्लर, दररोज सायंकाळी ४ पर्यंत सूरू राहतील. सार्वजनिक परिवहन बस सेवा पूर्णपणे सुरू राहतील. 
दरम्यान सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर खासगी चारचाकी वाहनातून  जिल्हयाबाहेरून उस्मानाबाद जिल्ह्रयात येणा-या  व इतर जिल्ह्रयात जाणा-या प्रवाशांना ई - पास बंधनकारक राहील.
 
Top