लोहारा , दि .२७:
छत्रपती कामगार संघटनेच्या वतीने लोकराजा ,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. व संघटनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. रुईकर यांनी कामगारांची व संघटनेच्या पदाधिकारी यांची आडचण लक्षात घेऊन कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रा संदर्भात लोहारा गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड यांनी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व भुमीहीन शासकीय नोकरी नसलेल्या मराठा व बहुजन लोकांना असे आवाहन केले कि, अशा कुटुंबासाठी शासनाकडून ५० ते ४० लाखा पर्यंत बिन व्याजी दिर्घ मुदतीचे कर्ज मिळावे, किंवा कसुन खाण्यासाठी ५ एकर गायरान जमीन मिळावी अथवा कुटुंबातील एका सदस्यांला शासकीय सेवेत घ्यावे अशा आशयाचे निवेदन शासन दरबारी दिले असल्याचे सांगितले व याचा फायदा सर्व बहुजन समाजाने घ्यावे व संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ गायकवाड यांनी शाहु फुले आंबेडकर यांचे कार्य उपस्थितांना सांगितले. दुपारच्या सत्रात जिजाऊ ब्रिगेडच्या लोहारा तालुका अध्यक्षा रंजनाताई हासुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संतोष रुईकर, संस्थेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड, बालाजी माटे, दत्तात्रय पाटील, महादेव धारूळे, दिपक तावडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी तर सुत्रसंचालन संघटना सचिव तिम्मा माने यांनी केले तर आभार जिल्हा सचिव बालाजी चव्हाण यांनी मानले.