लोहारा , दि. २७ :
मागील काही दिवसापासून लोहारा येथील काँग्रेस नेते, पदाधिकारी काँग्रेसची साथ सोडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन नवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लोहारा येथे जबर धक्का बसल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
लोहारा येथील जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे, माजी पं. स. सदस्य इंद्रजित लोमटे, माजी लोहारा ग्रामपंचायत सदस्य तथा काँग्रेस ओबीसी सेल माजी तालुकाध्यक्ष श्रीशैल्य स्वामी यांच्यासह राजेंद्र क्षीरसागर,अमोल माळी यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे सोपविला आहे.
आगामी होऊ घातलेल्या लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला गळती लागल्याने निवडणुकीपुर्वी काँग्रेसला हा दुसरा धक्का बसला आहे. तीन दिवस अगोदर काँग्रेसचे जेष्ठ नेते नागन्ना वकील हे समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस दाखल झाले होते.
लोहारा शहराच्या विकासासाठी जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी,मा.पं स सदस्य दिपक रोडगे,मा.पं स सदस्य इंद्रजित लोमटे, माजी लोहारा ग्रामपंचायत सदस्य तथा काँग्रेस ओबीसी सेल माजी तालुकाध्यक्ष श्रीशैल्य स्वामी हे लोहारा शहर विकास आघाडी
स्थापन करून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.