वागदरी , दि.२७ :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी वागदरी येथील युवा कार्यकर्ते महेश महादेव बिराजदार यांची निवड करण्यात आली.
नुकतेच तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत वागदरी ता.तुळजापूर येथील महेश बिराजदार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सदर निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोकुळ शिंदे ,रोहीत पवार युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष ॲड. अमोल पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विकी घुगे आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे आभिनंदन होत आहे.