नळदुर्ग , दि. २७ :  

संसर्गजन्य   कोरोनामध्ये   नळदुर्ग येथिल  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका श्रीमती सुमन शरणाप्पा फुले यांनी   उत्कृष्ट सेवा   केल्याबद्दल त्याची दखल  घेवुन " कोरोना योद्धा " म्हणून श्रीमती  फुले यांच्या   वाढदिवसाचे औचित्य साधून नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

शनिवार दि.२६ जुन रोजी श्रीमती सुमन फुले यांच्या निवासस्थानी    नळदुर्ग  शहर पञकार संघाच्यावतीने फेटा ,शाल, पुष्पहार ,पुष्पगुच्छ देवुन सन्मानित केले. त्याचबरोबर शनिवारी त्यांचा वाढदिवसाच्या असल्याने शुभेच्छाही देण्यात आले. यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , पञकार   तानाजी जाधव , विलास येडगे , शिवाजी नाईक, तानाजी जाधव,  दादासाहेब बनसोडे, उत्तम बणजगोळे , जेष्ठ नागरिक रघुनाथ नागणे , माजी नगरसेवक सुधीर हजारे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, संजय जाधव, , भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके ,   पञकार  मिञ अमर भाळे  इत्यादी उपस्थितीत होते.
 
Top