जळकोट,दि.२७ :
येथून जवळच असलेल्या मौजे वडगाववाडी (ता.लोहारा) येथे दि.२६ जुन रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अतर्गत कृषी संजीवनी मोहीम २०२१अंतर्गत बीजप्रक्रियाची माहिती देण्यात आली.
तसेच बी.बी. एफ यंत्राने पेरणी केल्याचे फायदे व निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, कीटकनाशक फवारणी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळेसाठी प्रशिक्षक अंकीता पाटील, संरपच अनिता भुजबळ ,कृषी ताई अनिता स्वामी , संगमेश्वर स्वामी, अंकुश भुजबळ, गणपती बोडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.