नळदुर्ग ,दि.१७ :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारे जनतेला मदत करण्याची भूमकिा घेण्यात आली असुन यात नेते, पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. येणा-या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि लोकनेते शरद पवार  यांचे विचार अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणे गरजेचे  असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष सुरेश  बिराजदार  यांनी व्यक्त केले.

 या कार्यक्रमात पक्षाचे निष्ठावंत   कार्यकर्ते   नळदुर्ग येथिल  बाबुलाल जैनुद्दीन शेख यांची राष्ट्रवादीच्या तुळजापूर तालुका मतदारसंघ सदस्यपदी निवड करण्यात आली. 
यावेळी  जिल्हाध्यक्ष सुरेश  बिराजदार , गोकुळ शिंदे  यांच्यां  हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर चोपदार, कार्याध्यक्ष  गोरख पवार,  युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवक तालुकाध्यक्ष संदीप  गंगणे ,शहराध्यक्ष नितीन रोचकरी, शरद जगदाळे,  युवा नेते गणेश ननवरे  ,अभय माने , तोफिक शेख'  विद्यार्थी जिल्हाध्यक्ष  दुर्गेश साळुंके यांची उपस्थिती होती.
 
Top