जळकोट,दि१२ : 
 नळदुर्ग मंडळ कृषी कार्यालयाचे कृषी सहाय्यक डी. पी. बिराजदार यांची कृषी पर्यवेक्षक वर्ग-१वर  पदोन्नती झाल्याबद्दल जळकोट ता. तुळजापूर  येथील श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी  वाचनालय या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.


तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संस्थेच्या कार्यालयात डी. पी.बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे,अशोक यादगौडा, सुनील साखरे,बालाजी पालमपल्ले, प्रमोद अंगुले आदीजण उपस्थित होते. बिराजदार हे तालुक्यातील  मुर्टा, चिकुंद्रा व मानेवाडी येथील कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत होते. कृषी खात्याच्या नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये त्यांची कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.
 
Top