उस्मानाबाद ,दि. १२ तुळजापूर  लाईव्ह टिम 
कोरोना महामारीचे संकट  सर्वञ  ओढवल्यावर   लाॅकडाउनमध्ये  घरी निवांत आराम करण्याऐवजी समाज मनाशी नाळ जोडल्या गेलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील
 कसबे तडवळे  येथील मनीषा वाघमारे  या युवतींना स्वस्थ बसवेना  , कोरोना  काळात जागोजागी अडकून पडलेल्यांचे हाल बघवेना, त्यामुळे कोरोना संकटाला सामोरे जात सामाजिक योगदान देण्याचा त्यांनी निश्चय केला.

 आपल्या घरची परिस्थिती बिकट असतानासुद्धा त्यानी अनेक रुग्णांचे पोट भरत त्यांच्या मनात व ह्रदयात जागा मिळवली आहे. त्यानी अनेक रुग्णांना डबे पुरवून  घास भरवला आहे. या गावच्या  मनीषा वाघमारे  या युवतीने  कोरोनाच्या कालावधीत रूगणाना डब्बे पुरवुन केलेल्या  सामाजिक कार्याची   दखल राष्ट्रीय कंपनी असलेल्या  डेटॉल कंपनीने  घेवुन  हॉंड वॉश डेटॉल   सॅल्युटस आभियानांतर्गत युवतीचा  फोटो प्रसिध्द केला आहे. 

मनीषा वाघमारे या उच्चशिक्षीत तरुणीला समाजकार्याची आवड असल्याने गेल्या वर्षभरापासून ती कोरोना काळात आपली सेवा बजावत आहे.  यावर्षी तिने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचे काम स्वखर्चातून हाती घेतले. दररोज दिवसभरात शभंरपेक्षा अधिक गरजु लोकांना 30 किलोमिटर दुचाकीवर जावुन  शासकिय व खासगी रुग्णालयात जेवणाचे डब्बे ती पोहोच केल्याचे सर्वश्रुत  आहे.

 वास्तविक पाहता मनिषा वाघमारे यांची घरची परिस्थीती बेताचीच असुन १६ वर्षापुर्वी त्यांच्या वडिलांचे छत्र हरवलयं. त्याची आई अंबिका वाघमारे  या चप्पल विक्रीचा व्यवसाय करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे त्यांचा हा व्यवसाय म्हणावा तसा चालेना . तरीही त्यांनी मागे न हटता अन्नदान करण्याचे काम नेटाने सुरू ठेवले . या कामात तिच्या आईसमवेत दोघी बहीणी माया आणि तेजल या देखील सहाकार्य केले आहे


मनीषा वाघमारे यांच्या या  कार्याची दखल डेटॉल या राष्ट्रीय कंपनीने घेवुन डेटॉल हॅन्डवॉश उत्पादनावर 'डेटॉल सॅल्युट्स' या शीर्षकाखाली मनिषाच्या फोटोसह तिने केलेल्या कामाची माहिती प्रसिध्द करुन गौरव  केल्याची  माहिती मिळताच उस्मानाबाद जिल्ह्यातील  तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रासह अनेक मान्यवरातुन मनिषा वाघमारे यांचे आभिनंदन करुन शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे.

 
Top