नळदुर्ग ,दि.१२:
येथील कोविड केअर सेंटरच्या आवारात वापरलेले पीपीई किट,मास्क,बॉटल, प्लास्टिक पिशव्या,हैंडग्लोव्हज, पत्रावळी, आदि पडलेले असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते, यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि .११ जून रोजी सोशल मीडिया वर पोस्ट व्हायरल करीत हा प्रकार उघडकीस आणला होता.
याप्रकरणी नगपालिकेने त्या कच-याची शनिवार रोजि विल्हेवाट लावली आहे,परंतु आणखी या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे, अशीच स्वच्छता कायम रहावी अशी मनसेने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी लक्षण राठोड यांच्याकडे मागणी केली आहे.