उस्मानाबाद ,दि.१६
पोलीस ठाणे, तुळजापूर: मिनीनाथ शिवाजी कदम व राम शंकर मिसाळ, वय 45 वर्षे, दोघे रा. बिजनवाडी, ता. तुळजापूर हे दोघे दि. 11 जून रोजी 19.30 वा. सु. तीर्थ (बु.) शिवारातील धनलक्ष्मी पेट्रोलीयम केंद्राजवळील रस्त्यावरुन मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 4509 ही निष्काळजीपणे चालवून मिनीनाथ कदम चालवत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने यात राम मिसाळ हे मयत होउन मिनीनाथ कदम हे जखमी झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक वाहनासह अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मिनीनाथ कदम यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, लोहारा: विकास गोरे, दौलत चव्हाण व विशाल गडकर, तीघे रा. आशिव, ता. औसा हे तीघे दि. 15 जून रोजी 16.30 वा. सु. माकणी धरणाच्या पुलावरुन मोटारसायकल क्र. एम.एच. 24 एएल 8719 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 0195 ही निष्काळजीपणे चालवून विशाल गडकर चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात विकास गोरे, दौलत चव्हाण हे दोघे मयत झाले व विशाल गडकर हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या दिलीप नागनाथ गोरे, रा. आशिव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: सिध्दार्थ आजीनाथ गायकवाड, वय 38 वर्षे, रा. भुम हे दि. 10 जून रोजी 22.00 वा. सु. ईट शिवारातील मैत्री हॉटेल समोरील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 12 एलके 3407 ने प्रवास करत होते. दरम्यान त्यांचे मो.सा. वरील नियंत्रण सुटून ते खाली पडून त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागलयाने मयत झाले. अशा मजकुराच्या महादेव काळखैर, रा. ईट, ता. भुम यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मयत- सिध्दार्थ गायकवाड यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.